ओझर शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 23:09 IST2020-04-05T23:08:59+5:302020-04-05T23:09:23+5:30

ओझरटाउनशिप : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शिल्लक पोषण आहाराचे वितरण इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थित करण्यात आले.

Distribution of school nutrition diet in Ozar school | ओझर शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप

ओझर शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप

ठळक मुद्देपोषण आहार घेण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.

ओझरटाउनशिप : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शिल्लक पोषण आहाराचे वितरण इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थित करण्यात आले. शासनाच्या सूचनेनुसार विशिष्ट अंतर ठेवून मास्कचा वापर करून पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, पोषण आहारप्रमुख व शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विजय हिरे, शाळेचे शिक्षक प्रतिनिधी गंगाधर बदादे, उमेश कुलकर्णी, शाळेतील शिक्षक उपस्थित होते. पालक प्रतिनिधी प्रशांत गोसावी तसेच गावातील बहुतेक पालक मोलमजुरी करत असल्याने पोषण आहार घेण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.

Web Title: Distribution of school nutrition diet in Ozar school