वैतरणा केंद्रातील विद्यार्थ्यांना रेडिओचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:37 IST2020-11-26T00:36:33+5:302020-11-26T00:37:01+5:30
वैतरणा केंद्रातील ५० विद्यार्थ्यांना एफएमचे वाटप करण्यात आले. केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर यावेळी उपस्थित हाेते. केंद्रातील वैतरणा, आडाचीवाडी व वाळविहीर या शाळांमध्ये वाटपाचे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आले.

वैतरणा केंद्रातील विद्यार्थ्यांना एफएम रेडिओचे वाटपप्रसंगी राजेंद्र नांदुरकर, शिवाजी अहिरे, शिवाजी अहिरे, राजेश शिरोले, पंकज जाधव आदी.
वैतरणानगर : वैतरणा केंद्रातील ५० विद्यार्थ्यांना एफएमचे वाटप करण्यात आले. केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर यावेळी उपस्थित हाेते. केंद्रातील वैतरणा, आडाचीवाडी व वाळविहीर या शाळांमध्ये वाटपाचे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आले. कोविडकाळात शाळा जरी बंद असल्या तरी एफएमचा वापर करून विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून राहतील, असा विश्वास नांदूरकर यांनी व्यक्त केला. शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, राजेश शिरोले, पंकज जाधव, दीपक भदाणे, सुनील धोंडगे, चिंतामण गांगुर्डे, रवि चव्हाण, श्रावण लोते, रेखा देवरे, नीता वसावे, सविता ठाकरे, प्रशांत उन्हवणे, हितेंद्र महाजन, उत्तम आवारी, चंद्रमोहन रामटेके, विजय भदाणे, राधकिसन रोंगटे शिक्षक उपस्थित होते.