आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना विजपंपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:21 IST2021-03-10T21:08:41+5:302021-03-11T01:21:01+5:30
त्र्यंबकेश्वर : दलपतपुर ता.त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसांना प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी व त्र्यंबकेश्वर तालुक्याचे प्रांताधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते शेतीसाठी उपयोगी असणारे विद्युत पंपांचे वाटप करण्यात आले.

दलपतपुर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसांना वीजपंप वाटपाप्रसंगी प्रांताधिकारी शुभम गुप्ता, तहसीलदार दीपक गिरासे, हेमंत कुलकर्णी, शरद खोडे आदींसह मान्यवर.
त्र्यंबकेश्वर : दलपतपुर ता.त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसांना प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी व त्र्यंबकेश्वर तालुक्याचे प्रांताधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते शेतीसाठी उपयोगी असणारे विद्युत पंपांचे वाटप करण्यात आले.
हरसूल जवळील दलपतपूर येथील आत्महत्या केलेले शेतकरी दशरथ भोये यांच्या वारसांना शेतीपयोगी वीजपंप देण्यात आला. महसूल, कृषी व पंचायत समितीच्या उभारी कार्यक्रमांर्गत वारसदार गीताबाई दशरथ भोये, उत्तम भोये यांना हा वीजपंप सुपुर्द करण्यात आला. यावेळी तहसिलदार दीपक गिरासे, मंडल अधिकारी हेमंत कुलकर्णी, तलाठी शरद खोडे आदीसह गुलाब चौधरी, पोलीस पाटील लता भोये, अनिल बोरसे, अमृत भोये आदी उपस्थित होते.