घोटीत गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबतर्फे गरजूंना शिधा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 16:21 IST2020-03-22T16:21:11+5:302020-03-22T16:21:43+5:30
घोटी : कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनाच्या वतीने पाळण्यात आलेल्या बंद काळात गोरबरीब व मजूरांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासांी येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या ३५० कुटूंबांना शिधा आट्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.

घोटीत गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबतर्फे गरजूंना शिधा वाटप
घोटी ही इगतपुरी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने याठिकाणी मोलमजुरी करणारे मजुर व कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बंदमुळे त्यांचा उदरनिर्वाहाची गैरसोय होऊ नये यासाठी येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या युवकांनी टप्या - टप्याने शिधा पाकिटांचे वाटप केले. त्यात तांदुळ , मुगदाळ, तेल, मसुरदाळ, मसाला, मिरची, हळद याचा समावेश होता. घोटी शहरासह आजूबाजूच्या परिसरात या पाकिटांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबचे निलेश काळे, निलेश आंबेकर, बाळासाहेब गव्हाणे, गुरूनाथ दुभाषे, शुभम भगत, दिपक भोर, ओम कंदकुरीवार, मनोहर किर्वे, संतोष व्यवहारे यांच्यासह क्रिकेट क्लबचे सदस्य उपस्थित होते.