टाकेद कोविड सेंटरला मास्क, सॅनिटीझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 00:04 IST2021-05-29T16:29:07+5:302021-05-30T00:04:59+5:30
सर्वतीर्थ टाकेद: येथील कोविड सेंटरला वाडिवऱ्हेचे भारतीय सेना दलातील सेवानिवृत्त जवान विजय कातोरे यांनी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर आणि पिण्याच्या पाण्याच्या बिस्लरी बॉटल बॉक्स चे वाटप केले.

सर्वतीर्थ टाकेद येथील कोविड सेंटरमध्ये मास्क,सॅनिटीझर, बिस्लरी देतांना सेवानिवृत्त जवान विजय कातोरे. समवेत सरपंच ताराबाई बांबळे,राम शिंदे यांच्यासह सर्व डॉक्टर,नर्स,कर्मचारी.
सर्वतीर्थ टाकेद: येथील कोविड सेंटरला वाडिवऱ्हेचे भारतीय सेना दलातील सेवानिवृत्त जवान विजय कातोरे यांनी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर आणि पिण्याच्या पाण्याच्या बिस्लरी बॉटल बॉक्स चे वाटप केले. शिवाय कोविड सेंटर मधील सर्व डॉक्टर, नर्स,आरोग्य सेविका,आशा कर्मचारी, कंपाउंडर,सफाई कर्मचारी, कोरोनातूं मुक्त होत असलेले रुग्ण यांचा सन्मान केला. कार्यक्रमाप्रसंगी सरपंच ताराबाई रतन बांबळे यांनी सेवानिवृत्त मिलटरी जवान विजय कातोरे यांचा टाकेद ग्रामपंचायतच्या वतीने व सर्व डॉक्टर नर्स यांच्या वतीने सत्कार केला.
याप्रसंगी डॉ भारती फुले,आरोग्य सेविका बी एन सोनवणे,चंद्रकांत गंभीरे, विजया बांबळे, सुनीता धादवड, आदी उपस्थित होते.