इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 22:54 IST2019-08-13T22:53:46+5:302019-08-13T22:54:20+5:30
घोटी : गोंदे दुमाला येथे राजयोग प्रतिष्ठान आयोजित दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार सोहळा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक, सिने अभिनेते किरण भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.

राजयोग प्रतिष्ठानच्या इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार वितरण कार्यक्र मात बोलतांना माजी महापौर अशोक मुर्तडक. सोबत सिने अभिनेते किरण भालेराव, अनंत सुर्यवंशी, आत्माराम मते आदी.
घोटी : गोंदे दुमाला येथे राजयोग प्रतिष्ठान आयोजित दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार सोहळा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक, सिने अभिनेते किरण भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.
अशोक मुर्तडक, अभिनेते किरण भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. योवळी प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अनंत सुर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, रमेश खांडबहाले, भगीरथ मराडे, माजी नगरसेवक अर्चना जाधव, अभिजित कुलकर्णी, गणेश मुसळे, पोलीस पाटील, भाऊसाहेब शेलार, अंकुश पवार, शंकर चव्हाण, विशाल खैरनार, निशांत जाधव, तानाजी मते उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श डॉक्टर डॉ. प्रशांत मुर्तडक, सरपंच गणपत जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत काळे, शिक्षक आदमाणे, साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, अॅड संदीप शेलार, पोलीस सोमनाथ बोराडे, युवा नेते तुकाराम वारघडे, गोविंद डगळे, शेतकरी गोपाळा भोसले, भास्कर मते, कैलास वाजे, विजय बोराडे, भाऊसाहेब पाळदे, रु ग्णमित्र निवत्ती गुंड, आत्माराम फोकणे, गोविंद डगळे, किर्तनकार माधव काजळे, रोहीदास मते, देवीदास वारूंगसे, मनोहर सायखेडे, अंकिता झनकर, कळसुबाई मित्र मंडळ व गडवाट एक सह्याद्री प्रवास बाळासाहेब भगत अशा समाजातील विशेष व्यक्तिमत्वांचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्र माचे आयोजन मनविसे जिल्हा उपाध्यक्ष व राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांनी केले होते.