३० कुटुंबांना किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:34 IST2020-04-29T21:02:31+5:302020-04-29T23:34:52+5:30
वैतरणानगर : इगतपुरीसारख्या अतिदुर्गम भागात आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या ३० कुटुंबांकरिता महिनाभर पुरेल इतक्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे.

३० कुटुंबांना किराणा वाटप
वैतरणानगर : इगतपुरीसारख्या अतिदुर्गम भागात आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या ३० कुटुंबांकरिता महिनाभर पुरेल इतक्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी दुर्बल कुटुंबांकरिता तांदूळ, गहू, साखर, तेल, डाळ, चहापुडा, मिरची मसाला, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे व प्रदेश अध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या मार्गदर्शनाने नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, अॅड. सुनील कोरडे, यशवंतराव दळवी, कांता सूर्यवंशी, मिथुन बिडवे, जनार्दन कडवे, ज्ञानेश्वर कडवे, संतोष खडांगळे, अक्षय दळवी, गजेंद्र सोपान कोरडे आदी बांधवांनी सहकार्य केले.