अग्रवाल सभेतर्फे फूड्स पॅकेट्सचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 22:51 IST2020-05-05T22:50:41+5:302020-05-05T22:51:31+5:30
नाशिक : अग्रवाल सभेतर्फे लॉकडाउन काळात गरजूंना विविध संस्थांच्या माध्यमातून फूड पॅकेट्सचे वितरण करण्यात आले.

अग्रवाल सभेतर्फे फूड्स पॅकेट्सचे वितरण
नाशिक : अग्रवाल सभेतर्फे लॉकडाउन काळात गरजूंना विविध संस्थांच्या माध्यमातून फूड पॅकेट्सचे वितरण करण्यात आले. प्रारंभी सुमारे ५०० ते २००० पॅकेट्सने सुरू झालेले हे कार्य ३ मेपर्यंत प्रतिदिनी सुमारे ३२०० फूड पॅकेट्सपर्यंत पोहोचले. आपत्ती निवारण कक्षासह स्थलांतरितांच्या काही निवारागृहांत तसेच मुंबईहून पायी निघालेले प्रवासी, झोपडपट्टीतील गरजू व निराधार मजूर कुटुंबांना हे वितरण करण्यात आले. या सेवाकार्यात आचारी सेवा देणाऱ्या कैलाश शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान सभेचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यात ताराचंद गुप्ता, सनदी लेखापाल राजेश चांद, दिनेश मंगेश अग्रवाल, श्याम ढेडिया, रवींद्र केडिया, विमल सराफ, मनोज अग्रवाल, अमित गोपाल अग्रवाल, डॉ. आदर्श अग्रवाल, अक्षय अग्रवाल, मनोहर अहिरे आदींचा सक्रिय सहभाग लाभला.