वनिता शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:08 IST2018-08-07T01:08:07+5:302018-08-07T01:08:23+5:30

 Distribution of educational material in Vanitha school | वनिता शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

वनिता शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

नाशिकरोड : राजस्थानी लेडीज सर्कलच्या वतीने वनिता विकास प्रशाळेच्या आवारात वृक्षरोपण करून विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. राजस्थानी लेडीज सर्कलच्या अध्यक्ष अनिता अग्रवाल, उपाध्यक्ष निलू खिवसरा, पद्मा राठी, राखी पारख, रंजना राठी, मंजू राठी आदींच्या हस्ते वनिता विकास प्रशाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय व विविध क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अलका राठी, वैशाली करवा, अंजू अग्रवाल, आशिमा केला, ज्योती राठी, अर्चना बियाणी, संस्थेच्या सहकार्यवाह कविता देशपांडे, सुप्रिया बनसोड, सरिता पाचपांडे, स्वाती झाडे, मंजूषा उदार, सारिका कुलकर्णी, मनोज अवचिते, स्वप्नील सूर्यवंशी, जगदीश मंडलिक, चेतन पाठक आदी उपस्थित होते.

Web Title:  Distribution of educational material in Vanitha school