मोहदरी जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंग कीट व खेळ साहित्य वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 18:18 IST2018-10-18T18:18:23+5:302018-10-18T18:18:45+5:30
सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील जिल्हा परिषेद शाळेस ‘ई लर्निंग कीट’ व खेळ साहित्य वितरीत करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत मोह व स्थानिक लोकवर्गणीतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला.

मोहदरी शाळेस ई-लर्निंग कीट व क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी सरपंच सुदाम बोडके, साहेबराव बिन्नर, लहानू करवर, नामदेव भिसे, संदीप बोडके, अंबादास सदगीर, सोमनाथ बोडके, संजय ढोनर आदी.
नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील जिल्हा परिषेद शाळेस ‘ई लर्निंग कीट’ व खेळ साहित्य वितरीत करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत मोह व स्थानिक लोकवर्गणीतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ योजनेतून मोहदरी येथील जिल्हा परिषद शाळेस संगणक संच, साऊंड सिस्टिम, प्रथमोपचार पेटी, खेळ साहित्य, पूरक अध्ययन खेळ साहित्य देण्यात आले. तसेच अंगणवाडीस प्रथमोपचार पेटी, खेळाचे साहित्य ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सुदाम बोडके यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळांना जास्तीत जास्त लोकसहभाग देण्यासाठी केंद्र प्रमुख संदीप गिते यांनी प्रेरित केले. साहित्याचा उपयोग विद्यार्थी घडविण्यासाठी, आनंददायी शिक्षण होण्यासाठी व्हावा असेही गिते यांनी सांगितले. माजी सरपंच कैलास बिन्नर यांनी स्वच्छता, शिक्षण व आरोग्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील सर्व गरजा भागविण्यसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढेही अशीच मदत विद्यार्थी हितासाठी करणार असल्याचे आश्वासन सरपंच बोडके यांनी दिले. यावेळी उपसरपंच साहेबराव बिन्नर, शालेय समितीचे अध्यक्ष लहानू करवर, ग्रामपंचायत सदस्य नामदेव भिसे, संदीप बोडके, अंबादास सदगीर, सोमनाथ बोडके, संजय ढोन्नर, वाळिबा सदगीर, शांताराम बिन्नर, योगेश बिन्नर, ग्रामविकास अधिकारी संतोष बुचडे आदींसह पालक समितीचे सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. साधना सानप यांनी सूत्रसंचालन केले. अरूण बिन्नर यांनी आभार मानले.