वडगाव पंगू येथे दाखल्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:18 IST2020-01-19T22:05:10+5:302020-01-20T00:18:47+5:30
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू महाराजस्व अभियानांतर्गत वडगाव पंगू येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ११३ विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

वडगाव पंगू येथे दाखले वाटप करताना सूर्यकांत चव्हाण, अकिल पटेल, रवींद्र लाड, शिवाजी जाधव, एस.व्ही. जाधव, गोकुळ महाले, सोमनाथ संसारे आदी़
दरेगाव : चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू महाराजस्व अभियानांतर्गत वडगाव पंगू येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ११३ विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी विविध दाखल्यांचे वेळोवेळी गरज भासते व हे दाखले काढण्यासाठी ग्रामीण भागातील पालकांचा वेळ वाया जातो व विद्यार्थ्यांनाही त्रास होतो तसेच शैक्षणिक नुकसान होऊ नये. वडगाव पंगू येथे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना चांदवडचे तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पंगू गावातील आपले सरकार सेवा केंद्र असलेल्या अभियानात वडगाव, रापली, कातरवाडी या गावांतील ११३ विद्यार्थ्यांना वेगवेगळे जातीचे व वय अधिवास प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या योजनेत नायब तहसीलदार डॉ. मीनाक्षी गोसावी, हिरे, रायपूरचे सरपंच विलास संसारे व प्रदीप गुंजाळ, तलाठी सालमुठे यांचे सहकार्य लाभले. यावेळी संस्थेचे संस्थापक यावेळी ग्रामस्थ रवींद्र चव्हाण, द्वारकानाथ चव्हाण, कैलास माकुणे, धर्मा चव्हाण, पोपट जाधव, जालिंदर चव्हाण, मुख्याध्यापक शिक्षकेतर, कर्मचारी आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.