चातुर्मास पारायण धारक साधकांना प्रमाणपत्रांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 16:02 IST2020-11-22T16:02:20+5:302020-11-22T16:02:53+5:30
पेठ : तालुक्यातील वाडी वस्तीवर सुरू असलेल्या चातुर्मास पठण सोहळयातील भाविकांना महाराष्ट्र वारकरी मंडळाच्या वतीने प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

गढईपाडा येथील पांडूरंग शिंगाडे व प्रकाश शिंगाडे यांना प्रमाणपत्र प्रदान करतांना वारकरीमंडळाचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ वालवणे, लक्ष्मण बाबा गावीत.
पेठ : तालुक्यातील वाडी वस्तीवर सुरू असलेल्या चातुर्मास पठण सोहळयातील भाविकांना महाराष्ट्र वारकरी मंडळाच्या वतीने प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
चातुर्मास पारायण समाप्ती निमित्त गढईपाडा, वडबारी, कळमबारी, शिवरपाडा, चिल्हारपाडा, निचयपाडा,कोटंबी आदी गावातील भाविकांना महाराष्ट्र वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ वालवणे यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर गर्दी न करता भाविकांच्या घरी जाऊन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी किसन बाबा गावीत, संजय महाराज भोये, उमाकांत महाराज शिंदे, दिलीप राऊत, कुमार भोंडवे, नामदेव देशमूख,लक्ष्मण बाबा भोये यांचे सह वारकरी महामंडळाचे सदस्य उपस्थित होते.