जि. प. परिसराला पुन्हा वाहनांचा गराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:52+5:302021-02-05T05:45:52+5:30
तरणतलाव चौकातील वाहतूक सुरळीत करावी नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाच्या चौकानजीक सायकलट्रॅकच्या कामासाठी बंद करण्यात आलेल्या रस्त्यामुळे या रस्त्यावरुन ...

जि. प. परिसराला पुन्हा वाहनांचा गराडा
तरणतलाव चौकातील वाहतूक सुरळीत करावी
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाच्या चौकानजीक सायकलट्रॅकच्या कामासाठी बंद करण्यात आलेल्या रस्त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हा रस्ता दिवसभर सातत्याने वाहतुकीचा असून, त्यावरील काम पूर्ण झाल्याने रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
एमजी रोडवर पुन्हा वाहतूक कोंडी
नाशिक : यशवंत व्यायामशाळा ते मेहेरदरम्यानच्या मार्गावर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारकाची वाहने तसेच रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने, वाहतूक समस्या निर्माण होण्यास पुन्हा प्रारंभ झाला आहे. नागरिकांनी केलेल्या बेशिस्त पार्किंगमुळेही या समस्येत भर पडली आहे.
पंचवटीत मोकाट कुत्र्यांचा उच्छाद
नाशिक : पंचवटी परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. काही विशिष्ट भागांमध्ये कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून फिरत असल्याने नागरिकांनाही त्यांची दहशत वाटू लागली आहे. मॉर्निंगवॉकवेळी अनेक कुत्र्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर टाकलेल्या शिळ्या अन्नामुळे कुत्र्यांचा उच्छाद वाढत चालला आहे.
उद्यानांमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव
नाशिक : शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. यंदा कोरोनामुळे उद्यानांचे काम हाती घेण्यात आले नसल्याने, वाढलेल्या गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचा ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.
अनधिकृत फलकांनी शहराचे विद्रुपीकरण
नाशिक : शहरात विविध ठिकाणी अनधिकृत जाहिरातीचे फलक लावून विद्रुपीकरण केले जात आहे. शहराचा मध्यवर्ती भाग, स्मार्ट रोड तसेच सर्व विभागातील प्रमुख ऱस्त्यांवर अशाप्रकारे पोस्टर, भित्तीपत्रके लावून विद्रुपीकरण होत आहे. अशा अनधिकृत फलक, पोस्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.