लग्नात जाण्याच्या करणाने वाद; चाकूने वार केल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 05:59 PM2020-09-05T17:59:34+5:302020-09-05T18:00:21+5:30

सटाणा : लग्नाला आले नाही म्हणून विचारण्याच्या किरकोळ भांडणाचे पर्यावसन तुफान हाणामारीत होऊन दोघांवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना मुल्हेर येथे घडली. केदारनाथ भिका पवार असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी अकरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Disputes over going to a wedding; One was stabbed to death | लग्नात जाण्याच्या करणाने वाद; चाकूने वार केल्याने एकाचा मृत्यू

केदारनाथ भिका पवार

Next
ठळक मुद्देमुल्हेर : एक गंभीर; अकरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

सटाणा : लग्नाला आले नाही म्हणून विचारण्याच्या किरकोळ भांडणाचे पर्यावसन तुफान हाणामारीत होऊन दोघांवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना मुल्हेर येथे घडली. केदारनाथ भिका पवार असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी अकरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्हेर येथील बाजारपेठेत पवार आणि पडाळकर कुटुंबीय वास्तव्यास आहेत. दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाला आले नाही म्हणून विचारणा करण्यावरुन बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. हाणामारीत चाकू व हातोडा यांचा वापर करण्यात आला. या हाणामारीत केदारनाथ भिका पवार (48) व दिनेश गोविंद पवार (40) या दोघांवर चाकूने सपासप वार करण्यात आले. केदारनाथ गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तत्काळ सटाणा येथील ग्रामीण रु ग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर दिनेश गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्रामीण रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे मुल्हेर गावात तणापूर्ण शांतता असून गाव बंद ठेवण्यात आले आहे.
(फोटो : 05केदारनाथ पवार)

Web Title: Disputes over going to a wedding; One was stabbed to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.