शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

लघुपाटबंधारे-बांधकाम निधी नियोजनावरून ‘वादंग’?

By admin | Updated: September 22, 2016 01:13 IST

प्रशासनाने ठेवले नियमावर बोट

नाशिक : लघुपाटबंधारे आणि बांधकाम विभागाच्या निधी नियोजनाचे अधिकार नेमके कोणत्या समितीला आणि कोणत्या पदाधिकाऱ्यांना आहेत, या मुद्द्यावरून आता मोठे वादंग उठण्याची चिन्हे आहेत. २७०२ लेखाशीर्षाखाली लघुपाटबंधाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव आणि रस्ते आणि इमारतीची कोट्यवधी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव प्रशासनाने उलट पावली परत पाठविल्याचे वृत्त आहे.दरम्यान, याप्रकरणी येत्या २७ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत याची परिणती प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील संघर्षात होण्याची चिन्हे आहेत. जलसंधारण समिती आणि बांधकाम समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांना सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक असते. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतरच प्रत्यक्षात या दोन्ही समित्यांची कामे निविदा स्तर आणि प्रत्यक्ष कार्यारंभ आदेशापर्यंत जातात. काही दिवसांपूर्वीच लघुपाटबंधारे विभागामार्फत २७०२ लेखाशीर्षाखाली कोट्यवधी रुपयांच्या बंधाऱ्यांची कामे मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आली होती. तसाच काहीसा प्रकार बांधकाम विभागामार्फत करण्यात आला.प्रत्यक्षात लघुपाटबंधारे आणि बांधकाम विभागाची ही कोट्यवधी रुपयांची कामे मंजुरीसाठी प्रशासनाकडे येताच, प्रशासनाने निधी नियोजनाचे अधिकार त्या त्या समित्यांना आणि सर्वसाधारण सभेला असताना, पाठविलेल्या कामांचे प्रस्ताव जलसंधारण समिती व बांधकाम समितीत मंजूर झाले आहे किंवा काय? त्या प्रस्तावांना सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे किंवा कसे? यासह अनेक बाबींवर बोेट ठेवत ते पुन्हा त्या त्या विभागांकडे उलट पावली परत पाठविल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)मागील काळात सर्व साधारण सभेत निधी नियोजनाचे अधिकार अध्यक्षांना देण्याचे ठराव झालेले आहेत; मात्र हे ठराव त्या त्या काळापुरता की सरसकट यापुढील काळात कायमस्वरूपी लागू करण्यात आले किंवा कसे? याबाबत जिल्हा परिषदेत चर्चा सुरू आहे. निधी नियोजनावरून आता पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.