शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

एकीचा प्रेमभंग : जुन्या नाशकात दोघा मुलींची एकचा दिवशी आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:48 IST

या दोन्ही घटनांमध्ये आत्महत्येचा प्रकार एकसारखा असून, तरुणीच्या आत्महत्येचे कारण पुढे आले असले तरी अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून चिठ्ठी शोधली आहे

नाशिक : जुने नाशिक परिसरात एका अल्पवयीन मुलीने अज्ञात कारणातून गळफास घेतला तर दुसऱ्या तरुणीने प्रेमभंग झाल्याचे कारण चिठ्ठीत लिहून राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या धक्कादायक दोन घटना जुने नाशिक भागात एकाच दिवशी घडल्याने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचा दोन महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता. याबाबत भद्रकाली पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजना कोंडीराम हरगावकर (१७ रा. कोळीवाडा, ५४ क्वॉर्टर) या अल्पवयीन मुलीने रविवारी (दि.३) दुपारच्या सुमारास घरी कोणी नसताना गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, वडील कोंडीराम हरगावकर यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ संजनाला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी स्पष्ट केले. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजनाचा दोन महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता, असे समजते.दुसºया घटनेत कथडा भागातील कोळीवाडा येथे राहणारी तरुणी प्रियंका राजू पवार (१८) हिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत प्रेमभंग हे आत्महत्येचे कारण आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून चिठ्ठी शोधली आहे. प्रियंकाचे वडील राजू पवार हे काल सकाळी कामानिमित्त सय्यद पिंप्री येथे गेले होते. यावेळी तिने गळफास घेतल्याची माहिती चुलत भाऊ सोमनाथ पवार याने राजू पवार यांना फोनवरून दिल्यानंतर ते घरी आले असता प्रियंकाने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी एक डायरी व मोबाइल ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू केला आहे. या दोन्ही घटनांमध्ये आत्महत्येचा प्रकार एकसारखा असून, तरुणीच्या आत्महत्येचे कारण पुढे आले असले तरी अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.विवाहितेची आत्महत्यापाथर्डी फाटा परिसरात राहणा-या कविता विजय पाटील (३५, रा. श्रीजी रो-हाउस) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. यावेळी त्यांचे पती विजय पाटील खालच्या खोलीत झोपलेले होते. दरम्यान, पाटील यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी