धरणग्रस्तांच्या जमिनींबाबत जलसंपदामंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:16 IST2020-02-25T22:04:03+5:302020-02-26T00:16:40+5:30
धरणग्रस्तांच्या संपादित जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, वैतरणा धरणासाठी संपादित जमिनींपैकी उर्वरित जमिनी मूळ शेतकºयांच्या नावावर करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असून, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.

वैतरणा धरणग्रस्तांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना हिरामण खोसकर. समवेत सुशीला मेंगाळ, गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, उमेश खातळे, अशोक शिंदे, देवराम शिंदे, नामदेव खातळे आदी.
वैतरणानगर : धरणग्रस्तांच्या संपादित जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, वैतरणा धरणासाठी संपादित जमिनींपैकी उर्वरित जमिनी मूळ शेतकºयांच्या नावावर करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असून, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.
वैतारणा धरण माती-खाणीकरिता संपादित केलेल्या आतिरिक्त जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात, या मागणीसाठी वैतरणा शेतकरी, धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने आवळी येथे आयोजित बैठकीत आमदार खोसकर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सभापती सुशीला मेंगाळ, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, उमेश खातळे,अशोक शिंदे, देवराम शिंदे, नामदेव खातळे आदी उपस्थित होते. येत्या अधिवेशनातदेखील हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित करणार असून, वेळ आली तर उपोशनालादेखील धरणग्रस्त शेतकºयांसोबत बसणार असल्याचे खोसकर यांनी सांगितले. धरणग्रस्तांना दाखले व नोकºयांसाठीही शासनस्तरावर मागणी करणार असल्याचेही खोसकर म्हणाले.
यावेळी वैतरणा धरणग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. कृती समितीचे अध्यक्ष पुंडलिक जमधडे यांनी प्रास्ताविक केले. रामदास जमधडे यांनी सूत्रसंचालन केले.