पेठ तालुक्यातील पाणीप्रश्नावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:22 IST2020-01-22T23:19:08+5:302020-01-23T00:22:29+5:30

सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित करंजाळी येथील एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली.

Discussion on water issues in Peth taluka | पेठ तालुक्यातील पाणीप्रश्नावर चर्चा

करंजाळी येथील एमजेएम महाविद्यालयात राज्यस्तरीय परिषदेप्रसंगी प्रा.शांताराम गुंजाळ, पद्माकर गवळी, प्राचार्य डॉ. आर. वाय. बोरसे, डॉ. एम. के. लांडे, डॉ. एस. जी. शंकरवार आदी.

ठळक मुद्देएमजेएम महाविद्यालय : दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषद

पेठ : सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित करंजाळी येथील एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली.
सटाणा महाविद्यालयाचे प्रा. शांताराम गुंजाळ यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जलअभ्यासक गोपीनाथ पाटील अध्यक्षस्थानी होते. मूलभूत विज्ञानात ननोमटेरिअलचे भविष्य हा परिषदेचा मुख्य विषय होता. प्रत्येकाने राष्ट्रीय मूल्य अंगीकारावी व विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ होऊन राष्ट्रीय मूल्य जोपासावी, असे गुंजाळ सांगितले. जलअभ्यासक गोपीनाथ पाटील यांनी पाण्याचा प्रश्न गंभीर असून, पेठ तालुक्यात पावसाचे पाणी अडवले पाहिजे व यावर उपाययोजना सुचविल्या. प्रा. डॉ. दीपक तायडे यांनी या परिषदेचे समाजातील महत्त्व सांगून या परिषदेद्वारा ननोमटेरिअलचे संशोधन होण्यास चालना मिळेल, असे मत मांडले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव पद्माकर गवळी, प्राचार्य डॉ. आर. वाय. बोरसे, औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. एम. के. लांडे, डॉ. एस. जी. शंकरवार, भेंडे महाविद्यालयाचे डॉ. मधुकर नवगिरे, नंदुरबार महाविद्यालयाचे डॉ. मनोहर पाटील, डॉ. अनिल कुलकर्णी, आरवायके महाविद्यालयाचे डॉ अशोक बोºहाडे, एलव्हीएच महाविद्यालयाचे डॉ. ठाणसिंग पवार आणि डॉ. के. एच. कापडणीस उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. स्मिता चव्हान आणि रोहित निकम यांनी केले.

Web Title: Discussion on water issues in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.