शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिपद देण्याची चर्चा; परदेशातून येताच भुजबळ म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 19:47 IST

मंत्रिपदाच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.

NCP Chhagan Bhujbal: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना यंदा मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर छगन भुजबळ हे काही दिवसांसाठी कुटुंबासोबत परदेशात निघून गेले होते. परदेशातून नाशिकमध्ये परतल्यानंतर आज छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि मंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आपली भूमिका मांडली आहे.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी छगन भुजबळ यांना संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की, "वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात, यावर मी काय चर्चा करू शकतो? आणि हे सुद्धा डोक्यातून काढून टाका की, मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून दुसऱ्या कोणाला तरी मंत्रिपदावरून काढा आणि त्यांच्या जागी मला मंत्रिपद द्या, हे माझ्या डोक्यात येणं अशक्य आहे. त्यामुळे आता बघू पुढे काय होतं ते," अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.

"परदेशात गेल्यानंतर मला कोणाचेही फोन आलेले नाहीत. आले तरी मी ते तुम्हाला सांगू शकणार नाही. पण मी थोडा वेळ राजकारणातून डोकं बाजूला काढलं होतं. १९६७ सालापासून राजकारणात काम करत आहे. त्यामुळे थोड्या वेळ आराम करणंही ठीक आहे," असंही भुजबळ यावेळी म्हणाले. 

दरम्यान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या जयंती आहे. या औचित्यावर चाकण इथं सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ हे एका मंचावर येणार आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एका मंचावर येणार असल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडे