पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची आढावा बैठक येथे युनियनचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार, सरचिटणीस गिरीश दाभाडकर व बाबुलाल थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या बैठकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी वपेन्शन योजना व प्रॉव्हिडंड फंड शासनाच्या भविष्य निर्वाह खात्यात जमा करणे या विषयावर चर्चा झाली.तसेच जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी मेळावा घेण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाला. यावेळी जिल्हा अध्यक्ष नामदेव पावसे, उपाध्यक्ष रशिद कादरी, निफाड तालुका अध्यक्ष गणेश ठाकरे, सिन्नर तालुका सचिव सुनील तुपसौंदाणे व पिंपळगाव येथील सुनील मोरे, रवींद्र चव्हाण, भरत बनकर, तानाजी थेटे, राकेश देशमुख, वसंत काळे, दीपक मोरे, मधुकर निकम, सौरभ महाले, रवींद्र मोरे, विनायक गवांदे, हनुमंत मोरे, आनंदा बनकर, बाळासाहेब जाधव आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्याबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 02:01 IST