शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

समस्या सुटेपर्यंत प्रभाग सभा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 2:04 AM

सिडको : महापालिका आयुक्तांकडून नागरी कामे सुरळीत होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य नागरिकांना भेडसवणारे प्रश्नदेखील अधिकारी मार्गी लावत नसल्याने प्रभाग सभेत सत्ताधाऱ्यासह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रभाग सभेत मांडण्यात आलेल्या समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पुढील सभा न घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्दे सिडकोत ठराव : सर्वच नागरी समस्यांविषयी तक्रार

सिडको प्रभाग समितीच्या बैठकीत बोलताना नगरसेवक कल्पना पांडे. समवेत सभेस उपस्थित नगरसेवक.सिडको : महापालिका आयुक्तांकडून नागरी कामे सुरळीत होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य नागरिकांना भेडसवणारे प्रश्नदेखील अधिकारी मार्गी लावत नसल्याने प्रभाग सभेत सत्ताधाऱ्यासह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रभाग सभेत मांडण्यात आलेल्या समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पुढील सभा न घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.सिडको प्रभाग समितीची सभा सभापती हर्षा बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.६) पार पडली. यावेळी नगरसेवक डी.जी. सूर्यवंशी यांनी स्वच्छता या विषयावर सूचना करून महापालिका आयुक्त सर्व कामकाज सुरळीत होत असल्याचे सांगत असले तरी सिडकोत मात्र परिस्थिती वेगळी असून, रस्त्यावरील घाण, कचरा व पालापाचोळादेखील उचलला जात नसल्याने सिडकोच्या विकासासाठी एकत्र होण्याचे आवाहनही नगरसेवक सूर्यवंशी यांनी केले. नगरसेवक किरण गामणे यांनी प्रभागात आठ दिवसांत घंटागाडी सुरळीत न झाल्यास प्रभागातील कचरा महानगरपालिकेत आणणार असल्याचे सांगितले. नगरसेवक प्रतिभा पवार यांनी मनपा आयुक्तांच्या वॉक विथ कमिशनरप्रमाणे वॉक विथ सभापती विथ अधिकारी असा उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे सांगत अधिकाºयांकडून नागरिकांची मनपाशी निगडित कुठलीही कामे होत नसल्याचा आरोप केला. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी घंटागाडी ठेकेदाराकडून प्रशासनाने काम करून घेतले पाहिजे. प्रशासनाने लक्ष न दिल्यास शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर सिडकोतील घरांवर अतिक्रमणाच्या फुल्या महापालिकेने केल्या असल्या तरी सिडकोच्या घरांची परवानगी महानगर पालिकेने दिली नसल्याने त्यांना तो अधिकार नसल्याचे सांगितले. या प्रभाग सभेत केवळ मागील बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात येऊन नगरसेवकांनी प्रभागातील समस्यांचा पाढा वाचला. पुढच्या सभेच्या सुरु वातीला या मागील विषयांवर चर्चा होईल आणि मगच नवीन काम सुरू होईल असा नवीन पायंडा सुरू केल्याचे सभापती हर्षा बडगुजर यांनी जाहीर केले. अधिकाºयांनी नगरसेवकांशी स्वत:हून संपर्कसाधून समस्या जाणून घेतल्या पाहिजे अशी सूचना केली.नगरसेवक रत्नमाला राणे कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यावर कारवाई करावी असे सांगितले. तर नगरसेवक सुदाम डेमसे यांनी पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या अनेक अतिक्रमणांबाबत अधिकाºयांना सांगूनही ते लक्ष देत नसल्याचा आरोप केला. मुकेश शहाणे यांनी प्रभागातील नाला बंद केल्याचा तर श्यामकुमार साबळे यांनी प्रभागातील रस्त्यांवर असलेल्या ड्रेनेजवर डांबर टाकून ते बंदिस्त केल्याने निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. यावेळी नगरसेवक संगीता जाधव, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, पुष्पा आव्हाड, कावेरी घुगे, कल्पना चुंभळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.नगरसेवक आक्रमकसिडकोतील प्रभाग क्रमाक २४ मधील शिवाजी चौक भाजी मार्केट येथील अतिक्रमणामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन त्यावर लक्ष देत नसल्याने कल्पना पांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली व प्रभाग सभेतच ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली. यावर सभापती हर्षा बडगुजर व विभागीय अधिकाºयांनी डॉ. सुनीता कुमावत येत्या आठ दिवसांत काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यामुळे पांडे यांनी आंदोलनाची भूमिका मागे घेतली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडको