शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांची गैरसोय : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पडणार ताण

By admin | Updated: April 28, 2015 22:25 IST

सिंहस्थासाठी ओढा रेल्वेस्थानक दुर्र्लक्षित

नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर भाविकांचा संभाव्य ताण कमी करण्यासाठी ओढा रेल्वेस्थानकाचा पर्याय दिला होता; मात्र याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही घोषणा झाली नसल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर भाविकांचा प्रचंड ताण पडून गैरसोय होण्याची शक्यता आहे.आगामी सिंहस्थात जगभरातून भाविक नाशिकनगरीत येणार आहेत; मात्र भाविकांच्या तुलनेत नाशिकरोड रेल्वेस्थानकाची क्षमता कमी पडत असल्याने यावर पर्याय काढला जावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. त्याकरिता नाशिकरोड रेल्वेस्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढा रेल्वेस्थानकाचा सिंहस्थात वापर व्हावा यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. दरम्यान, त्यावर चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. सिंहस्थात नियमित गाड्यांव्यतिरिक्त सात सिंहस्थ स्पेशल अतिरिक्त गांड्या सोडल्या जाणार असल्याने या गाड्या नाशिकरोडला थांबविल्यास स्थानकावर ताण पडू शकतो. त्यामुळे या स्पेशल अतिरिक्त गाड्या ओढा स्थानकावर थांबविण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे मांडला होता; मात्र या प्रस्तावावर अद्यापपर्यंत कुठलीही घोषणा केली नसल्याने भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा केला जात असलेला कायापालट बघता ओढा रेल्वेस्थानकाचा सिंहस्थात विचार केला जाऊ शकणार नसल्याचे चिन्हे आहेत. सध्या नाशिकरोड रेल्वेस्थानकाची रुंदी वाढविण्यात आली असून, ट्रॅकची लांबीदेखील वाढविली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या रेल्वेचे यूटर्नदेखील काढण्यात आले. ओव्हरहेड वायरी बदलण्यात आल्या. त्या तुलनेत ओढा रेल्वेस्थानकाच्या विकासाची कुठल्याही कामांना सुरुवात केलेली नाही. ं