नाशिक ग्रामीणच्या १६ पोलिसांना महासंचालक पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:24 AM2019-05-03T00:24:39+5:302019-05-03T00:26:27+5:30

नाशिक : पोलीस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवेसाठी नाशिक जिल्ह्णातील १६ ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.१) महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले.

 Director General of Police of Nashik Rural Police | नाशिक ग्रामीणच्या १६ पोलिसांना महासंचालक पदक

नाशिक ग्रामीणच्या १६ पोलिसांना महासंचालक पदक

googlenewsNext
ठळक मुद्दे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना गुणवत्तेच्या आधारे या पदकाने सन्मानित

नाशिक : पोलीस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवेसाठी नाशिक जिल्ह्णातील १६ ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.१) महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले.
राज्य पोलीस दलातील पोलीस आयुक्तालये, पोलीस अधीक्षक कार्यालये, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, गुप्तवार्ता विभाग, दहशतवाद विरोधी पथक, बिनतारी संदेश विभाग, प्रशिक्षण व खास पथके, एसआरपीएफ, वाहतूक, महामार्ग, लोहमार्ग अशा विविध पथकांमधील गुणवत्ताधारक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलीस महासंचालकांचे पदक दिले जाते. गंभीर व क्लिष्ट गुन्ह्णांचा छडा लावणे, गुन्हेगारांना जेरबंद करणे, राष्ट्रीय स्तरावर खेळात प्रावीण्य, नैसर्गिक आपत्तीचे वेळी मदतकार्य, पोलिसांची प्रतिमा उजळ करणे, अशा विविध प्रकारांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना गुणवत्तेच्या आधारे या पदकाने सन्मानित करण्यात आले. यात एक पोलीस उपनिरीक्षकासह तीन सहायक पोलीस उपनिरीक्षक, ११ पोलीस हवालदार, तर एक पोलीस नाईक यांचा समावेश आहे. पदकप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक, राजेद्र चौधरी, आर्थिक गुन्हे शाखा, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सुनील गायकवाड, महामार्ग सुरक्षा पथक, दीपक सूर्यवंशी, जिल्हा विशेष शाखा, अरुण मुंढे, मोटर परिवहन विभाग
पोलीस हवालदार। पांडुरंग पारधी, मोटर परिवहन विभाग, सुनील कदम, मोटर परिवहन विभाग, राजाराम दिवटे, स्थानिक गुन्हे शाखा, प्रकाश चव्हाणके, स्थानिक गुन्हे शाखा, शिवाजी जुंदरे, स्थानिक गुन्हे शाखा
दिलीप घुले, स्थानिक गुन्हे शाखा, सुलतान शेख, पवारवाडी, पोलीस ठाणे, भागीरथ सोनवणे, नियंत्रण कक्ष, मालेगाव, अशोक धामंदे, अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो, नाशिक, सुभाष हांडगे अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो, नाशिक
प्रमोद आहिरे, अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो नाशिक,
पोलीस नाईक, राजेंद्र जाधव, पिंपळगाव पोलीस ठाणे़

Web Title:  Director General of Police of Nashik Rural Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस