बागलाण ब्रँडी हाऊसचे संचालक हरीश मखिजा यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:15 IST2020-11-23T23:58:41+5:302020-11-24T02:15:19+5:30
लोहोणेर : सटाणा येथील बागलाण ब्रँडी हाऊसचे संचालक हरीश गोवर्धनदास मखिजा ( ६२) यांनी येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात ऊडी घेत आत्महत्या केली. सोमवारी (दि.२३) सकाळी त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

हरीश माखिया
लोहोणेर : सटाणा येथील बागलाण ब्रँडी हाऊसचे संचालक हरीश गोवर्धनदास मखिजा ( ६२) यांनी येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात ऊडी घेत आत्महत्या केली. सोमवारी (दि.२३) सकाळी त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. रविवारी (दि.२२) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पुलावरून नदीत उडी घेतल्याचे लक्षात आल्याने तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री दीड वाजेपर्यंत यश न आल्याने सोमवारी (दि.२३) सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. ठेंगोडा सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ एकाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सटाणा येथील हरीश माखिजा यांचा असल्याचे लक्षात आले. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.