शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विरुद्ध टोकांच्या जुळवणीवर राजकारणाची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 22:56 IST

येवला नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपने निसटता विजय मिळविला होता. येत्या काळात राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

ठळक मुद्दे‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा पवित्रा : शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष; भाजपला विरोध हाच मुख्य अजेंडा

दत्ता महाले।येवला : नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपने निसटता विजय मिळविला होता. येत्या काळात राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.भाजप विरोध हाच एक अजेंटा समोर ठेवून यापुढील काळात राष्टÑवादी व शिवसेना हातात हात घालून काम करते काय यावरच पुढील सत्तेची समीकरणे अवलंबून असणार आहे. राष्टÑवादीचे आमदार व कॅबिनेट मंत्रिपदी पुन्हा विराजमान झालेले छगन भुजबळ, सेनेचे आमदारद्वयी दराडे बंधू आणि ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे ही तीन टोके कशी जुळतात यावरही पालिकेतील राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. तूर्त दोन वर्षे वेट अ‍ॅण्ड वॉचचीच भूमिका बघत बसावे लागणार आहे.२०१६मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप-सेना युती असतानाही भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणण्यात आमदार किशोर दराडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आता राज्यात सत्तांतर झाले असले तरी स्थानिक पातळीवर भाजप-सेनेच्या संबंधात मात्र फारसा फरक पडल्याचे दिसून येत नाही. मात्र, तब्बल तीन वर्षानंतर पालिकेत विकासकामे होत नसल्याचा सूर आळवत आता राष्टÑवादी, शिवसेना आणि शहर विकास आघाडी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.येवला नगर परिषदेने ३१ आॅगस्ट २०१७ रोजी घेतलेल्या सर्वसाधारण सभेत चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर व इतर आकारणीसंदर्भात ठराव केला होता. भाजप-सेनेची युती असताना आमदार दराडे बंधूंनी भाजपचा नगराध्यक्ष करण्यासाठी आपले कौशल्य वापरल्याने राष्ट्रवादीच्या तत्कालीन उमेदवार उषाताई शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. असे असले तरी दरम्यानच्या काळात माणिकराव शिंदे आणि दराडे यांच्या राजकीय संबंधातील दुरावादेखील कमी झाला आहे. अशा परिस्थितीत पालिकेच्या सत्ताबदलाची शक्यता धूसर आहे.मात्र, येत्या काळात राज्यातील बदललेल्या परिस्थितीचे स्थानिक राजकारणात काय पडसाद उमटतात, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.

जिल्हा परिषदेकडे लक्षजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत सर्वसाधारण गटासाठी खुली झाली आहे. येवल्यातून सेना आणि राष्ट्रवादीत इच्छुक अधिक आहेत. जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदासाठी कशी खेळी खेळली जाते? याचा प्रभावदेखील येवला पालिकेच्या राजकारणावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून पुढील राजकारणाचीही दिशा निश्चित होऊ शकते.

सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासाला अडथळा करणाऱ्यांविरोधात कोणतीही भूमिका घेण्याची वेळ आली तरी मागे पुढे पाहणार नाही. कोणतीही विकासकामे होत नाहीत. जनतेच्या हितासाठी सर्व सहमतीने प्रत्येक प्रकरणी शहर विकास आघाडी ठोस भूमिका घेत आता सभागृहातून थेट रस्त्यावर उतरणार आहे. पहिला दणका मालमत्ता करवाढी विरोधात देणार आहोत.- रु पेश लोणारी, गटनेता, शहर विकास आघाडी

राष्ट्रवादी कॉँग्रेस विकासात्मक कामासाठी पक्षभेद विसरून नेहमी सोबत राहिली आहे. विकासकामाबाबत नेहमी आक्र मकपणे भूमिका घेतली आहे. अन्यायकारक करवाढीबाबतही आक्रमक भूमिका घेतलेली आहे. यापुढे बदलत्या राजकारणाबाबत वेट अ‍ॅण्ड वॉच हीच भूमिका राहील.- डॉ. संकेत शिंदे,गटनेता, राष्टÑवादी

टॅग्स :Politicsराजकारण