शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आगीत डाळिंबबाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:46 AM

तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सटाणा : तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  मंगळवारी महसूल विभागाने पंचनामा केला. डाळिंबबागेतील सर्व १२०० झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेवाळे कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले आहे. शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. यावेळी शेतात काम करत असलेले भास्कर शेवाळे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, यात त्यांचा हात व पायाला गंभीर जखमा झाल्या. त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील इतर शेतकºयांना बोलविण्याचा आटापिटा केला; मात्र सोसाट्याचा वारा व आगीच्या रौद्ररूपामुळे तीन एकर क्षेत्रावरील संपूर्ण बाग भस्मसात झाली. या आगीत शेवाळे यांच्या १२०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र, फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युतपेटी, वायर आदी सर्व साहित्य जळून खाक झाले.  दरम्यान, तलाठी वाय. जी. पठाण, कृषी सहायक एस. के. पाटील, ग्रामसेवक आर. एच. शेख यांनी भेट देऊन पंचनामा केला. महसूल, वीज महावितरण व कृषी विभागाने या बाबीची दखल घ्यावी आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नंदकिशोर शेवाळे, दादाजी शेवाळे, दीपक शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, बबन गांगुर्डे, दगा गांगुर्डे, रोशन शेवाळे, सुनील जगताप आदींनी केली आहे.होत्याचे नव्हते झाले...!चौगाव परिसरात लताबाई शेवाळे व त्यांचे दीर भास्कर शेवाळे यांनी भीमदरा शिवारातील बंद्या डोंगरालगत खडकाळ जमिनीचे दीड वर्षापूर्वी सपाटीकरण करून डाळिंबबाग फुलवली होती. बहार धरण्याची वेळ आली असताना कष्टांना फळ मिळेल या अपेक्षेत शेवाळे कुटुंबीय होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनींमध्ये अचानक घर्षण झाल्याने डाळिंबबागेवर ठिणग्या पडल्या. त्यामुळे संपूर्ण बागेने क्षणात पेट घेतला. १२०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र (फिल्टर मशीन), फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युतपेटी, वायर आदी साहित्य जळून खाक झाले. होत्याचे नव्हते झाल्याने शेवाळे कुटूंबियांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.वर्षभरापूर्वी पती वसंत शेवाळे यांचे निधन झाल्यानंतर सोने गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले होते. आपल्या दीड एकरावर डाळिंबबाग घ्यावी, कुटुंबाचे भविष्य घडवावे आणि कर्ज फेडायचे अशी इच्छा होती; मात्र आगीने होत्याचे नव्हते झाल्याने आता कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मदत करावी अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही.  - लताबाई वसंत शेवाळे

टॅग्स :FarmerशेतकरीFairजत्रा