दिंडोरीचे भारत संचार निगम कार्यालय करवसुलीसाठी सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:04 IST2021-03-30T21:27:51+5:302021-03-31T01:04:32+5:30

दिंडोरी : येथील भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) दिंडोरी कार्यालयाने नगरपंचायतची ९१,००७ रुपये थकबाकी न भरल्याने सदर कार्यालय सील करण्यात आले.

Dindori's Bharat Sanchar Nigam office sealed for tax collection | दिंडोरीचे भारत संचार निगम कार्यालय करवसुलीसाठी सील

दिंडोरीचे भारत संचार निगम कार्यालय करवसुलीसाठी सील

ठळक मुद्देकराची ९१,००७ रुपये थकबाकी तीन वर्षांपासून प्रलंबित

दिंडोरी : येथील भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) दिंडोरी कार्यालयाने नगरपंचायतची ९१,००७ रुपये थकबाकी न भरल्याने सदर कार्यालय सील करण्यात आले.

येथील भारत संचार निगमच्या दिंडोरी कार्यालयाकडे नगरपंचायतच्या कराची ९१,००७ रुपये थकबाकी
तीन वर्षांपासून प्रलंबित होती. नगरपंचायत प्रशासनाने वारंवार नोटीस पाठवून ही थकबाकी भरण्यात आली नाही, त्यामुळे सदर कार्यालय दिंडोरी नगरपंचायततर्फे सील करण्यात आले.

मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या मार्गदशनाखाली सील कारवाई करण्यात आली. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रशांत पोतदार, कर निरीक्षक मावलकर, ईश्वर दांडगव्हाळ, सागर भदाणे, चिंतामण वाघ, बाळू निसाळ उपस्थित होते. (३० दिंडोरी)

Web Title: Dindori's Bharat Sanchar Nigam office sealed for tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.