दिंडोरी तालूक्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 21:01 IST2019-10-06T21:01:17+5:302019-10-06T21:01:51+5:30
वणी : दिंडोरी तालूक्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असुन तालूक्यातील काही भागात गेल्या तीन दिवसांपासुन शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

दिंडोरी तालूक्याला पावसाने झोडपले
लोकमत न्युज नेटवर्क
वणी : दिंडोरी तालूक्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असुन तालूक्यातील काही भागात गेल्या तीन दिवसांपासुन शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारासं पावसास प्रारंभ झाला. ओझे, करंजवण, नळवाडी, निगडोळ, म्हेळूस्के, लखमापुर, खेडले, पिंपरखेड, नळवाडपाडा, कादवा, म्हाळुंगी, जानोरी, खेडगाव, शिंदवड, चिंचखेड, वलखेड, कोल्हेर, वरखेडा, आंबे दिंडोरी व परीसरात जोरदार पर्जन्य वृष्टी झाली. वणी शहरात पाच वाजुन तिस मिनिटांनी पावासास सुरु वात झाली. मात्र तितकासा जोर पावसात नव्हता, मात्र परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकरीवर्ग अडचणीत सापडला असुन पिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तिवण्यात येत आहे.