ठाणगाव विद्यालयात जलसाक्षरता दिनानिमित्त दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 17:38 IST2019-07-16T17:37:14+5:302019-07-16T17:38:12+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात जलसाक्षरता दिनानिमित्त जल व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणगाव विद्यालयात जलसाक्षरता दिनानिमित्त दिंडी
प्राचार्य व्ही.एस कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शाळा समितीचे सदस्य अरूण केदार, पर्यवेक्षक बी. बी. पगारे, एस. ओ. सोनवणे यांच्या हस्ते दिंडी पालखीचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय हरित सेनेच्या इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये विविध झाडांची रोपे तसेच जल बचत, वृक्षारोपणाचा संदेश देणारे फलक घेऊन सहभाग घेतला. हरितसेना प्रमुख वाय. एम. रूपवते यांनी पाणी बचत करणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचे काळजीपूर्वक नियोजन समाजातील सर्व घटकांनी करून पाणीवापर करावा असे आवाहन केले. प्राचार्य व्ही. एस. कवडे यांनी वृक्षारोपणाचे महत्व विषद केले प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एस. बी. ठुबे, एस. डी. सरवार, वाय. एम मणियार, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.