दिलीप दातीर यांचा राजीनामा; सुदाम कोंबडे मनसेचे नवे शहराध्यक्ष
By संजय पाठक | Updated: October 15, 2023 14:49 IST2023-10-15T14:48:38+5:302023-10-15T14:49:33+5:30
सुदाम कोंबडे हे २०१३ मध्ये पक्षाचे तीन वर्ष कालावधीसाठी जिल्हाध्यक्ष होते

दिलीप दातीर यांचा राजीनामा; सुदाम कोंबडे मनसेचे नवे शहराध्यक्ष
संजय पाठक
नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना आज मुंबई येथे शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र त्यांना प्रदान केले.
सुदाम कोंबडे हे २०१३ मध्ये पक्षाचे तीन वर्ष कालावधीसाठी जिल्हाध्यक्ष होते दरम्यान २०१७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र अलीकडेच त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे मनसेचे यापूर्वीचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिला होता मात्र त्यावर राज ठाकरे यांनी निर्णय घेतला नव्हता आज सुदाम कोंबड्यांची नियुक्ती केल्यामुळे दातीर यांचा राजीनामा आपोआपच मंजूर झाला आहे.