लोकसहभागातून साकारला ‘डिजिटल वर्ग ’
By Admin | Updated: September 11, 2016 01:15 IST2016-09-11T01:14:36+5:302016-09-11T01:15:26+5:30
फागंदर : आदिवासी वस्तीशाळेस विद्यार्थ्यांची भेट

लोकसहभागातून साकारला ‘डिजिटल वर्ग ’
पिळकोस : फांगदर या आदिवासी वस्तीवरील प्राथमिक शाळेने, शेतमजुरांची लोकवस्ती असतांनाही शिक्षकांनी लोकसहभागातून शाळा ई-लर्निंग करत चार संगणकयुक्त डिजीटल वर्ग तयार केला आहे. तसेच इतरही सोयी सविधा शाळेने सोशीअल मिडियाच्या शिवाय सामाजिक संस्थांकडून मिळवत विकास साधला आहे.
कळवण तालुक्यातील पिळकोस येथील जिल्हा परिषद शाळेची खामखेडा येथील फांगदर या शेतमजुरांच्या आदिवासी वस्तीवरील उपक्र मशील शाळेस क्षेत्रभेट उपक्रमा अंतर्गत नुकतीच भेट दिली.
शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवुन गुणवत्ता विकास साधनार्या या शाळेची सुरवात पाचटाच्या खोपटात, नंतर कांदा चाळीत, त्यानंतर मातीच्या घरात भरत असलेल्या ह्या शाळेने आज जिल्यात आपल्या शैक्षणकि उपक्र म शिलतेतून जिल्ह्यात लौकिक मिळवला आहे. या शाळेची सुदर इमारत असून, शालेय परिसरात चारशे झाडे लावण्यात आलेली आहे. डिजटल वर्ग, ई लर्नग साहित्य वाचन कट्टा शालेय बगीचातील औषधी गार्डन अश्या शाळेची निवड पिळकोस येथील प्राथमिक शाळेने क्षेत्रभेट उपक्र मा अंतर्गत केल्याने खामखेडा येथील फांगदर या आदिवासी वस्तीवरील प्राथमिक शाळेस भेट दिली.
(वार्ताहर)