ंमुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:00 IST2019-06-15T22:44:26+5:302019-06-16T01:00:00+5:30
मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम करून रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आल्याने वाहतुकीस सतत अडथळे होत आहे. त्यामुळे अपघातदेखील वाढत आहेत.

ंमुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम
नाशिक : मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम करून रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आल्याने वाहतुकीस सतत अडथळे होत आहे. त्यामुळे अपघातदेखील वाढत आहेत.
नॅशनल हायवेच्या वतीने रस्त्यांची दुरु स्ती, देखभालचे कामकाज केले जाते, परंतु नियोजनशून्य कारभारामुळे नाशिकच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण होऊनही नाशिकमध्ये वारंवार ठिकठिकाणी पुन्हा बदल करून कामे केली जात आहे आणि ही कामे महिनाभर चालतच राहतात. सदर काम करण्याकरिता लागणारे मटेरियल हेदेखील रस्त्यावर पडलेले दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यात वाहनांना अडथळे निर्माण होऊन अपघात घडत आहेत. यामुळे नाशिककरांना तसेच बाहेरून जाणाऱ्या वाहतुकीस सतत अडथळे निर्माण होत आहे. तहान लागेल तेथे विहीर खोदा या म्हणीप्रमाणे वाटेल तिथे रास्ता खोदा, वाटेल तिथे रास्ता बनवा, अशारितीने महामार्गावर काम चालू असल्याचे दिसून येत आहे. स्टेट बँक चौक व स्प्लेंडर हॉलसमोरील महामार्गावर समांतर रोडला जोडण्यात आला आहे. नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाºया भरधाव वाहने या ठिकाणी समांतर रोडला उतरतात.
याठिकाणी रस्त्याला लागूनच मंगल कार्यालय हॉल, झोपडपट्टी, अशोका बिझनेस स्कूल आणि पेट्रोलपंप असल्याने सतत वर्दळ असते या ठिकाणी नागरिकांकडून गतिरोधक बनविण्याची मागणी होत आहे. दीपालीनगर, स्टेट बँक चौक, सुमन पेट्रोलपंप या ठिकाणी पायी जाणाऱ्यांकरिता हायवे क्रॉस करण्याकरिता नवीन बोगदा तयार करण्यात आला. परंतु आजही पूर्णपणे वापरात नाही.