डिझेल चोरणाऱ्या चोरट्यांना पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 19:13 IST2021-07-27T19:12:35+5:302021-07-27T19:13:25+5:30
सिन्नर : येथील तळवाडी परिसरातून आयशर टेम्पोमधूत डिझेलचोरी करून पळणाऱ्या दोघा चोरट्यांचा सिन्नर पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.

डिझेल चोरणाऱ्या चोरट्यांना पाठलाग करून पकडले
सिन्नर : येथील तळवाडी परिसरातून आयशर टेम्पोमधूत डिझेलचोरी करून पळणाऱ्या दोघा चोरट्यांचा सिन्नर पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
चोरट्यांकडून ह्युंडाई कारसह ८० लीटर चोरीचे डिझेल जप्त करण्यात आले. सचिन बाळासाहेब पवार (२६), विजय पुंडलिक शिंदे (२७, दोघे रा. तळवाडी, सिन्नर) अशी संशयितांची नावे आहेत. तळवाडी शिवारात उभ्या असलेल्या आयशर टेम्पोच्या (क्र .एम. एच. ४३, ई. ८८७०) टाकीमधून मध्यरात्री दीडच्या सुमारास डिझेल चोरी केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस नाईक राहुल निरगुडे व चेतन मोरे यांनी तळवाडी शिवार गाठला.
तथापि, चोरट्यांनी एका कारमधून पोबारा केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून नायगाव रोडला त्यांना पकडले. ह्युंडाई कारसह (क्र .जी. जे. ०५, सीएस ३३२२) व ७७०९ रुपये किमतीचे ८० लीटर डिझेल जप्त करण्यात आले. आयशर चालक बाळू शिवाजी पवार (४८, रा. तळवाडी, सिन्नर) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ पुढील तपास करीत आहेत.