पेठ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 13:40 IST2021-02-06T13:39:30+5:302021-02-06T13:40:15+5:30
पेठ - केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कृषी विधेयकाचा निषेध करत पेठ तालुका किसान सभा, जनवादी महिला संघटना, माकपा व डीवायएफआय यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

पेठ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
पेठ - केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कृषी विधेयकाचा निषेध करत पेठ तालुका किसान सभा, जनवादी महिला संघटना, माकपा व डीवायएफआय यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. माकपाचे तालुकाध्यक्ष कॉ. देवराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हातात लाल झेंडे व घोषणा देत पेठ शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.केंद्र शासनाने शेतकरी विरोधी आडमूठे धोरण अवलंबल्याने देशभरातील शेतकरी संतापला असून दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ. देवराम गायकवाड, तालुका सेक्रेटरी कॉ. नामदेव मोहांडकर, कॉ. मुरलीधर निंबेकर, गुलबा चौधरी, प्रभाकर गावीत, जाकीर मनियार, तारा दुदे, ताई राथड, सिता भोये, तुळसा दरोडे, उत्तम महाले, रामभाऊ गहले, अमृता फसाळे, चंदर धुळे, तुकाराम गवळी, विठ्ठल मानभाव, रामभाऊ बोके यांचेसह तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.