धनश्री पगार हिची लांबउडी स्पर्धेत राज्यपातळीवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 18:11 IST2018-10-18T18:09:49+5:302018-10-18T18:11:15+5:30
निफाड तालुक्यातील लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील विद्यार्थीनी धनश्री रमेश पगार हिची लांबउडी क्रीडा स्पर्धेत राज्यपातळीवर निवड झाली आहे.

निफाड तालुक्यातील लासगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाची विद्यार्थी धनश्री पगार हिची लांब उडी स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तीचा सत्कार करतांना मान्यवर.
सिन्नर : निफाड तालुक्यातील लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील विद्यार्थीनी धनश्री रमेश पगार हिची लांबउडी क्रीडा स्पर्धेत राज्यपातळीवर निवड झाली आहे.
लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयची विद्यार्थीनी व सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील जगन्नाथ काशिनाथ पगार यांची पुतणी धनश्री पगार हिने विभागीय पातळीवर यश मिळविले.
धुळे येथे झालेल्या विभागीयस्तरीय स्पर्धेत लांब उडी प्रकारात नाशिक विभागात तीने दुसरा क्रमांक पटकविला. क्र ीडा शिक्षक के. बा. तासकर, शि. ल. पाटील व पगार यांचे तीला मार्गदर्शन लाभले.