शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

सोडूनी घडाळ्याची साथ, दिंडोरीचे धनराज महाले शिवबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 2:26 PM

नाशिक- गेल्या लोकसभा निवडणूकीत दिंडोरी मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसने पक्षातील निष्ठावान महिलेला उमेदवारी डावलून ज्या शिवसेनेच्या धनराज महाले यांन अल्पकाळात या पक्षाची साथ सोडली असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (दि. १६) मुंबईत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. दुसरीकडे नाशिकमधील भाजपाच्या महापौर रंजना भानसी यांचे बंधू असलेल्या दिलीप राऊत यांनीही सेना जवळ केली आहे. तर दुसरीकडे इगतपुरीतील कॉँग्रेस पक्षाच्या आमदार निर्मला गावीत देखील शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देराष्टÑवादी कॉँग्रेसला धक्का  महापौरांचे बंधुंचाही सेना प्रवेश कॉँग्रेस आमदार निर्मला गावितांच्या पक्षांतराचीही चर्चा

नाशिक- गेल्या लोकसभा निवडणूकीत दिंडोरी मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसने पक्षातील निष्ठावान महिलेला उमेदवारी डावलून ज्या शिवसेनेच्या धनराज महाले यांन अल्पकाळात या पक्षाची साथ सोडली असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (दि. १६) मुंबईत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. दुसरीकडे नाशिकमधील भाजपाच्या महापौर रंजना भानसी यांचे बंधू असलेल्या दिलीप राऊत यांनीही सेना जवळ केली आहे. तर दुसरीकडे इगतपुरीतील कॉँग्रेस पक्षाच्या आमदार निर्मला गावीत देखील शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याने राजकिय घडामोडींना वेग आला आहे. शुक्रवारी (दि.१६) राष्टÑवादीचे धनराज महाले यांनी शिवबंधन बांधले. त्यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे तसेच जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.

निधर्मी जनता दलाचे माजी खासदार (कै.) हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव असलेले धनराज महाले यापूर्वीही शिवसेनेत होते. दिंडोरी मतदार संघातून ते शिवसेनेचे आमदार होते. गेल्या लोकसभा निवडणूकीत दिंडोरी लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादीने त्यांना उमेदवारी दिली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून पराभूत झालेल्या डॉ. भारती पवार यांना डावलूून राष्टÑवादीने महाले यांना संधी दिली. मात्र भाजपाने भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी महाले यांचा दणदणीत पराभव केला होता. परंतु राष्ट्रवादीत त्यांना न थांबता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाले यांनी परत शिवबंधन बांधले. युतीच्या जागा वाटपात दिंंडोरी विधान सभा राष्टÑवादीच्या वाटेला होता. सध्या त्या ठिकाणी राष्टÑवादीचे नरहरी झिरवाळ हे आमदार आहेत.

दुसरीकडे दिंडोरीतीलच भाजपाचे माजी खासदार कचरू भाऊ राऊत यांचे चिरंजीव दिलीप राऊत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकमधील भाजपाच्या महापौर रंजना भानसी यांचे ते सख्खे बंधु आहेत.दरम्यान, इगतपुरी- त्र्यंबक विधानसभा मतदार संघातून दोनवेळा निवडणूक आलेल्या कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावीत या देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे तालुक्याच्या हितासाठी आपण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ असे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस