लासलगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:07 IST2020-10-25T22:49:39+5:302020-10-26T01:07:57+5:30
लासलगाव. भारतीय घटनेचे शिल्पकार ; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी विजयादशमी दिनी लाखो समूहाला नागपूर येथे १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक मोठे मानव उत्थानाचे कार्य केले आणि पददलितांना एक समानपातळीवर आणून एक मोठी धम्मक्रांती घडवून आणली, असे डॉ. अमोल शेजवळ यांनी उपस्थित बांधवाना शुभेच्छा देताना संबोधित केले.

लासलगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
लासलगाव. भारतीय घटनेचे शिल्पकार ; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी विजयादशमी दिनी लाखो समूहाला नागपूर येथे १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक मोठे मानव उत्थानाचे कार्य केले आणि पददलितांना एक समानपातळीवर आणून एक मोठी धम्मक्रांती घडवून आणली, असे डॉ. अमोल शेजवळ यांनी उपस्थित बांधवाना शुभेच्छा देताना संबोधित केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रमनताई शेजवळ यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
त्यानंतर सुशीला शेजवळ यानी त्रिसरण पंचशिलाचे पठण केले. सदरप्रसंगी शुभेछा देताना कॉंग्रेसच्या वतीने सचिन होळकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी रिपाइं शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ, शहराध्यक्ष सोनू शेजवळ, सागर आहिरे, अर्शद शेख, अमोल संसारे, नुमान शेख, श्याम साळवे, करण साळवे, भास्कर शेजवळ, साळवे, बद्री शेजवळ, संघराज एळींजे, मनोज शेजवळ, मिलिंद गायकवाड, अशोक गायकवाड, रमेश कर्डक, अविनाश पगारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास खंडीझोड यानी केले.