वाढत्या उन्हामुळे गोदाकाठ पडला ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:59 IST2018-02-21T13:52:08+5:302018-02-21T13:59:29+5:30
धार्मिक पुुण्यनगरी म्हणून ओळख असलेला नाशिकचा रामकुंड, पंचवटीचा परिसर वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ओस पडत आहे. परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.

वाढत्या उन्हामुळे गोदाकाठ पडला ओस
नाशिक : येथील गोदावरीचा रामकुंड परिसर नेहमीच भाविक पर्यटकांनी गजबजलेला पहावयास मिळतो; मात्र मागील तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तपमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाचा चटका शहरात जाणवू लागला आहे. यामुळे गोदाकाठाचा रामकुंड परिसरही ओस पडू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
भारताची दक्षिणवाहिनी गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरीनदीला धार्मिकदृष्टया विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक कार्य, विधीसाठी भाविक देशभरातून या ठिकाणी हजेरी लावतात. रामकुं ड परिसराला धार्मिक-पौराणिकदृष्टया महत्त्व प्राप्त आहे. यामुळे भाविकांची सतत या भागात वर्दळ पहावयास मिळते.
