शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

भर उन्हात भाविकांचे सप्तशृंगगडाकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 6:04 PM

मालेगाव : डोक्यावर आग ओकणारा सूर्य.. पायाखाली तळपती भुई.. हातात भगवा झेंडा.. खांद्यावर पिशवी सोबत ढोलताशा व डीजेचा नाद.. मुखी आदिशक्ती सप्तशृंगीचा जयघोष करीत मध्य प्रदेशासह उत्तर महाराष्टÑातील हजारो भाविक सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवासाठी वणीच्या दिशेने निघाले आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे मालेगाव शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. मजल दरमजल करीत हजारो भाविक साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धेशक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. भाविकांची सेवा घडावी यासाठी यात्रा मार्गातील विविध गावातील नागरिकांनी पाणपोई, अन्नछत्र उभारले आहे. दरम्यान सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका देवीभक्तांना बसला. अचानक आलेल्या पावसामुळे भक्तांची निवाऱ्यासाठी धावपळ उडाली होती.

उत्तर महाराष्टÑातील खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून सप्तशृंगी देवीचा गड ओळखला जातो. दरवर्षी चैत्रपौर्णिमेला गडावर चैत्रोत्सव साजरा केला जातो. या यात्रोत्सवानिमित्त खान्देश भागातील अमळनेर, भडगाव, पाचोरा, जळगाव, धुळे यासह मध्य प्रदेशातील इंदूर, सेंधवा, उत्तर महाराष्टÑातील विविध शहरांमधून लाखो भाविक देवीचरणी लीन होतात. पदयात्रा करत हजारो भाविक गडावर पोहोचतात. सध्या कसमादे भागातील सर्वच रस्ते देवीभक्तांनी फुलून गेले आहेत.सध्या मालेगाव शहर परिसराचे तापमान ४२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले जात आहे. उन्हाच्या तीव्रतेची परवा न करता हजारो भाविक पदयात्रा करीत आहेत. शहर परिसरात धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली आहे. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हावी यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, संस्था, मित्रमंडळांकडून पाणी, जेवणाची व निवासाची व्यवस्था केली जात आहे. दरेगाव गावाजवळ दरेकर परिवाराकडून गेल्या १७ वर्षांपासून भाविकांसाठी नास्ता-अन्नछत्र उभारले जाते. तसेच मंडप टाकून विश्रांतीची सोय केली जाते. याच भागात अल कबीर या शाळेतही भाविकांच्या विश्रांतीची सोय करण्यात आली आहे. देवीचा मळा, नवीन बसस्थानक भागात पिण्याच्या पाण्याची, तर पांजरापोळ शॉपिंग सेंटर भागात भाविकांसाठी फराळ, नास्त्याचे वाटप करण्यात येत आहे.छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ विधायक मित्रमंडळाने पाण्याची व औषधांची सोय केली आहे. सटाणा रस्त्यावर मालेगाव केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे गडावर जाणाºया भाविकांची वैद्यकीय सेवा केली जात आहे. २४ तास सुरू राहणाºया या तात्पुरत्या सेवा केंद्रात असोसिएशनचे जवळपास २० ते २५ सदस्य कार्यरत आहेत.सटाणा रस्त्यावरील श्रीगुरुदेव भक्तमंडळातर्फे गेल्या २९ वर्षांपासून देवीभक्तांसाठी जेवणाची सोय केली जाते. अष्टमीपासून सुरू होणारे अन्नछत्र जवळपास आठवडाभर चोवीस तास सुरू असते. सटाणा नाका भागात जागोजागी पाणपोयी सुरू करण्यात आल्या आहेत.सोयगाव येथील भाग्यलक्ष्मी कार्यालय भाविकांच्या सेवेसाठी अहोरात्र खुले ठेवण्यात आले. या ठिकाणी भाविकांच्या जेवणाची, झोपण्याची तसेच अंघोळीचीसुद्धा सोय करण्यात आली आहे. टेहरे चौफुली येथेही पाणपोयी सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक