शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

शाही मिरवणुकीतून फुलणार भक्तीचा मळा

By admin | Updated: August 29, 2015 00:25 IST

सकाळपासून प्रारंभ : साधूंचे रथ, मर्दानी खेळ ठरणार आकर्षण

शाही मिरवणुकीतून फुलणार भक्तीचा मळासकाळपासून प्रारंभ : साधूंचे रथ, मर्दानी खेळ ठरणार आकर्षणनाशिक : फुलांनी सुशोभित केलेले रथ, उंट-घोड्यांवर विराजमान साधू-महंत, श्री महंत-महंतांची पाचशेहून अधिक वाहने, भजन-संकीर्तन करणारे तीस ते चाळीस हजार साधू... डोळ्यांचे पारणे फेडणारे मर्दानी खेळ, बॅण्डपथकाची धामधूम अशा भारलेल्या वातावरणात शनिवारी (दि. २९) कुंभमेळ्याच्या शाहीस्नानानिमित्त सकाळी ६ वाजता साधू-महंतांची शाही मिरवणूक निघणार आहे. कुंभमेळ्यात साधूंच्या शाहीस्नानापाठोपाठ सर्वाधिक आकर्षण असते ते स्नानापूर्वी निघणाऱ्या शाही मिरवणुकीचे. साधुग्राम निवासी वैष्णवपंथीय साधूंचे आखाडे इष्टदेवतांना घेऊन मिरवणुकीने एकापाठोपाठ शाहीस्नानासाठी पवित्र रामकुंडाकडे रवाना होतात. साधूंच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या या मिरवणुकीला ‘शाही मिरवणूक’ म्हटले जाते. या मिरवणुकीची तयारी साधुग्राममध्ये रात्रभर सुरू होती. शनिवारी पहाटे साधू स्नान करून इष्टदेवतांसह मिरवणुकीत सहभागी होतील. निर्वाणी अनी, दिगंबर अनी व निर्मोही अनी असा आखाड्यांचा मिरवणुकीतील क्रम राहणार आहे. साधुग्राममधील लक्ष्मीनारायण मंदिरापासून सकाळी ६ वाजता निर्वाणी अनी आखाड्याची मिरवणूक निघेल. ६.३० वाजता दिगंबर अनी, तर ७ वाजता निर्मोही अनीच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल. प्रत्येक आखाड्याच्या मिरवणुकीत दोनशे मीटरचे अंतर राहणार आहे. लक्ष्मीनारायण मंदिर, काट्या मारुती पोलीस चौकी, गणेशवाडी देवी चौक, पंचवटी आयुर्वेदिक कॉलेज, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, सरदार चौक या मार्गे मिरवणूक रामकुंडावर पोहोचेल. तेथे निशाण व इष्टदेवतेचे विधिवत पूजन केले जाईल. इष्टदेवता हनुमानाला स्नान घातले जाईल. त्यानंतर आखाड्याच्या प्रमुख श्री महंतांचे व नंतर साधूंचे स्नान होईल. स्नानानंतर ज्या क्रमाने आखाडे दाखल झाले, त्याच क्रमाने ते परतीच्या मार्गाने साधुग्रामकडे रवाना होतील. दरम्यान, शाही मिरवणुकीची शुक्रवारी साधुग्राममध्ये जय्यत तयारी सुरू होती. खालशांच्या वतीने महंतांची वाहने फुलांनी सजवली जात होती. (प्रतिनिधी)