श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर जाण्यास भाविकांना बंदी
By प्रसाद गो.जोशी | Updated: September 19, 2023 13:46 IST2023-09-19T13:45:43+5:302023-09-19T13:46:04+5:30
गेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय पर्वतावर दुर्घटना घडून दरड पडल्याने ५ ते ६ भाविक जखमी झाले होते.

श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर जाण्यास भाविकांना बंदी
कळवण- ऋषीपंचमी निमित्ताने श्री मार्कंडेश्वर पर्वतावर श्री मार्कंडेश्वर ऋषींच्या दर्शनासाठी व भरणाऱ्या यात्रेसाठी मोठया प्रमाणात भाविक येत असल्यामुळे लाखोचा जनसागर पर्वतावर येतो. गेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय पर्वतावर दुर्घटना घडून दरड पडल्याने ५ ते ६ भाविक जखमी झाले होते. त्यामुळे ऋषी पंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर दर्शनाला जाण्यासाठी व यात्रा भरविण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी बंदी घातली असून गोबापूरचे सरपंच यांना याबाबत कळविले आहे.
मार्कंड पिंप्री येथील पर्वतावर ऋषीं पंचमी निमित्ताने श्री. मार्कंडेश्वर पर्वततावर भरणाऱ्या यात्रेला बुधवारी (२० सप्टेंबर) परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गोबापूरचे सरपंच यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी व पर्वतावर जाण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी भाविकांना बंदी घातली आहे.