घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:18 IST2018-08-07T01:18:18+5:302018-08-07T01:18:33+5:30

जेलरोड त्रिवेणी पार्क जवळील ठाकूर चाळ येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून झालेल्या घरफोडीतील १ लाख २० हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच चोरलेल्या रोकडमधून घेतलेले सोन्याचे दागिने, मोबाइलदेखील जप्त करण्यात आले आहेत.

 Detention of burglar robbery | घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक

घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक

नाशिकरोड : जेलरोड त्रिवेणी पार्क जवळील ठाकूर चाळ येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून झालेल्या घरफोडीतील १ लाख २० हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच चोरलेल्या रोकडमधून घेतलेले सोन्याचे दागिने, मोबाइलदेखील जप्त करण्यात आले आहेत.  जेलरोड त्रिवेणी पार्क जवळील ठाकूर चाळ येथे राहणाºया अनुसया गोपाल कराळे यांनी काही दिवसांपूर्वीच घर विकल्याने त्यांच्याकडे घरात २ लाख ३० हजार रुपयांची रोकड होती. २६ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान अनुसया कराळे या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरातून २ लाख ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. कराळे या गेल्या शनिवारी घरी आल्या असता त्यांना घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक उत्तम दळवी, प्रकाश भालेराव, राजेंद्र जाधव, समाधान वाजे यांनी तपासचक्रे फिरविली. पोलिसांना सराईत गुन्हेगार दीपक कुमावत याने ही घरफोडी केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार जेलरोड पंचक शनि मंदिराजवळ उभा असलेला संशयित दीपक विष्णू कुमावत (२१) रा. दीप्ती अपार्टमेंट अयोध्यानगर जेलरोड यास पकडले असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली.

Web Title:  Detention of burglar robbery