शेतकऱ्यांकडून वेली पिके नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:38 IST2020-07-23T15:38:18+5:302020-07-23T15:38:50+5:30
दिंडोरी/जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने व वातावरणातील बदलामुळे वेली पिकावर व्हायरस रोग आल्याने वेली पिके नष्ट करण्याची वेळ आली शेतकऱ्यांवर आली आहे.त्यामुळे शेतक-यांना लाखो रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

जानोरी परिसरात नगदी पीक म्हणून टोमॅटो, शिमला मिरची, वांगी, फ्लावर कोबी या पिकाबरोबरच वेली पिक म्हणून दोडका, भोपळा, गिलके, कारले, वालवड,वेली घेवडा आधी पीक केले जातात.परंतु पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे पिकांवर अनेक प्रकारचे रोग येऊ लागल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अगोदरच कोरोनामुळे शेतकरºयांचा माल तयार करूनही विकता येत नाही. कधी लोकडाउन होते. व्यापारी संप करतात. कधी माल गाड्या वाले संप करतात. हमाल संप करतात. असे अनेक संकटे येऊन पण शेतकरी हार न मानता आपली शेती करत असतो. पण यावर्षी करोना महामारी रोगावर बरोबर पावसानेही दडी मारल्याने शेतकºयांना अनेक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .
अनेक दिवसापासून पाऊस पडत नसल्याने या परिसरात पांढरी माशी, आळई, मिलीबग, तुडतुडे, असे अनेक प्रकारचे कीटक वाढले आहे. त्यामुळे वेली पिकच्या दोडका, भोपळा, कारले, गिलके, वेली घेवडा या पिकावर वायरस या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या वेली पिकावर अनेक प्रकारचे औषधे फवारले असतानाही वेली पिक सुधरत नसल्याने शेतकरी नष्ट करत आहे.