नियतीची निर्दयी खेळी, एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 18:36 IST2021-04-13T18:32:13+5:302021-04-13T18:36:44+5:30

नाशिक : नियती कधी-कधी किती क्रूर होऊन जाते, हे येवला तालुक्यातील राजापूर येथे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने अधारेखित झाले आहे. राजापूरमधील जाधव कुटुंबीयांतील पाच जणांचा एकाच सप्ताहात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या दु:खद घटनेने अवघे राजापूर गाव सुन्न झाले आहे.

Destiny's ruthless game, the victim of five members of the same family | नियतीची निर्दयी खेळी, एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी

नियतीची निर्दयी खेळी, एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील घटना : राजापुरात आठवडाभरात जाधव कुटुंबावर आघात

नाशिक : नियती कधी-कधी किती क्रूर होऊन जाते, हे येवला तालुक्यातील राजापूर येथे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने अधारेखित झाले आहे. राजापूरमधील जाधव कुटुंबीयांतील पाच जणांचा एकाच सप्ताहात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या दु:खद घटनेने अवघे राजापूर गाव सुन्न झाले आहे.

राजापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार अरुण माधवराव जाधव यांच्या आई मालनबाई माधवराव जाधव या आजारी असल्याने त्यांच्या दोन बहिणी मुंबई येथून आईला भेटण्यासाठी राजापूर येथे आल्या होत्या. मात्र, त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर जाधव यांच्या कुटुंबात एकेकाला त्रास जाणवायला सुरुवात झाली. तेथून नियतीचा खेळ सुरू झाला आणि सप्ताहभरातच जाधव कुटुंबीयांतील स्वतः अरुण जाधव, मुलगा अमित जाधव, आई मालनबाई जाधव आणि अरुण जाधव यांच्या दोन बहिणी शोभा सातदिवे व छाया वाघ यांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. सप्ताहभरातच जाधव कुटुंबीयांतील पाच सदस्य इहलोक सोडून गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मागील वर्षीच अरुण जाधव त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्या दुःखातुन सावरत नाही तोच एकाच कुटुंबातील पाच जण दगावल्याची घटना घडली. या घटनेने राजापूर गाव सुन्न आणि नि:शब्द झाले आहे.


दिव्यांग मुलाच्या भवितव्याचा प्रश्न
जाधव यांना एक मतिमंद मुलगा असून, या दुर्दैवी घटनेमुळे या मुलाचा संगोपन करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुण जाधव यांच्या कुटुंबातील कर्ता मुलगा अमित जाधव हाच एकमेव या कुटुंबाचा आधार होता. मात्र नियतीने अमितच्याही पत्नी व मुलाच्या भवितव्याचा प्रश्न उभा केला आहे. अमित यास पत्नी व लहान मुलगा असून, त्याचा दिव्यांग असलेल्या लहान भावाचीही जबाबदारी तो सांभाळत होता. या घटनेने राजापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Destiny's ruthless game, the victim of five members of the same family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.