शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

ठेवीदार राज्यव्यापी आक्र ोश मोर्चाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:10 IST

येवला : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीत १९ कोटी रु पयांच्या ठेवी आहेत. गेल्या चार वर्षांपासून ठेवींच्या मुदती केव्हाच संपल्या आहेत, परंतु अद्यापही ठेव परत मिळत नाही. या ठेवी परत मिळाव्यात म्हणून येवल्यासह महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण,  थेट मोर्चासह अनेक आंदोलने  झाली. जळगाव मुख्य शाखेत प्रशासक नेमला आहे. तरीही वारंवार ...

येवला : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीत १९ कोटी रु पयांच्या ठेवी आहेत. गेल्या चार वर्षांपासून ठेवींच्या मुदती केव्हाच संपल्या आहेत, परंतु अद्यापही ठेव परत मिळत नाही. या ठेवी परत मिळाव्यात म्हणून येवल्यासह महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण,  थेट मोर्चासह अनेक आंदोलने  झाली. जळगाव मुख्य शाखेत प्रशासक नेमला आहे. तरीही वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नाही. यामुळे हवालदिल व त्रस्त झालेले व संभ्रमात सापडलेल्या ठेवीदारांनी थेट जळगाव येथे राज्यात अशोक मंडोरे, संजय सोनवणे यांच्यासह अवसायक, राज्य सरकार, केंद्र सरकार यांना जागे करण्यासाठी ठेवीदारांनी गुरुवार ३१ मे २०१८ रोजी आक्र श मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. जळगाव बसस्थानक शेजारी, महात्मा गांधी उद्यान येथे जमण्याचे आवाहन केले आहे. ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह कशा पद्धतीने मिळविता येतील याबाबत आता पुन्हा विचारमंथन सुरू झाले आहे. सर्वदूर कोट्यवधी रु पयांच्या ठेवी असणाऱ्या रायसोनी पतसंस्थेचे येवला शहर व तालुक्यात बाराशे ठेवीदार असून, १९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या ४ वर्षांत येवल्यात एकदिवसीय उपोषणासह अनेक आंदोलने झाली. जळगाव येथे तीनशे ठेवीदारांचा मोर्चादेखील निघाला, यात येवल्याचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता, परंतु यश आले नाही. राज्य सरकारदेखील याबाबत हतबल झाल्याने ठेवीदारांनी दिल्लीपर्यंत धाव घेतली. संजीव सोनवणे, प्रल्हाद कोतवाल, सुभाष विसपुते, कृष्णा शिंदे, प्रताप देशमुख, विजय सानप, विनोद गोसावी, गुमानसिंग परदेशी, सोमनाथ खंदारे, प्रतिबाला पटेल, अविनाश देसाई, राजू क्षत्रिय, विलास शिंदे यांच्यासह अनेक ठेवीदार यासाठी पाठपुरावा व संघर्ष करीत आहेत. ठेवीच्या भरवशावर मुला-मुलींचे शिक्षण, आजारपण, लग्न ही सारी कामे लांबणीवर पडली आहेत. आता अखेर या ठेवीदारांनी थेट पंतप्रधान व केंद्रीय वित्तमंत्री यांना साकडे घालण्याचे नियोजन या बैठकीत  केले आहे. आम्हाला आमच्या  ठेवी परत मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन या ठेवीदारांकडून केले आहे.  बुडतीच्या डोहात फसल्याने त्रस्त झालेल्या ठेवीदारांनी आपल्या कष्टाचा पैसा मिळावा म्हणून ठेवीदार संघटना गेल्या चार वर्षांपूर्वी स्थापन केली. या दृष्टीने योजनाबद्ध कार्यक्र म आखून उपोषण व संघर्षाची भूमिका घेतली होती, परंतु नियोजनबद्ध ठोस कृतियुक्त पाठपुरावा झाला नाही. कृतियुक्त कार्यक्र म तयार करून संघर्ष करण्याची तयारी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ४अनेक ठेवीदार आजाराने बिछान्यावर पडून आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रि या करावयाची आहे. पण सर्व पैसे बीएचआरमध्ये ठेवले गेले आणि हे पैसे बुडाले असल्याची त्यांना खात्री झाली आहे. संघर्षातून कष्टाचे पैसे परत मिळविण्यासाठी अखेरचा निर्णायक लढा देणार असल्याचा संकल्प ठेवीदारांनी केला आहे. संस्थेच्या ठेवी बुडण्याच्या धास्तीने काहींनी आम्ही आत्महत्या करावी काय? त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. पैसे बीएचआरमध्ये ठेवले गेले आणि हे पैसे बुडण्याच्या मार्गावर आहेत. केवळ ८० टक्के रक्कम का होईना परत द्या अशा संतप्त भावना बैठकीत व्यक्त केल्या आहेत. ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष गुमानसिंग परदेशी, सचिव प्रल्हाद कोतवाल, रंगनाथ खंदारे, अविनाश देसाई, सुभाष विसपुते, राजेश रामचंद्र पटेल, सुरेश हिराचंद पटेल, ईश्वर सूर्यवंशी, रमेशचंद्र राठी, इक्बाल पटेल, मिलिंद दातरंगे, वसंत गोसावी, सुभाष साळवे यांच्यासह ठेवीदार एल.झेड. वाणी, नामदेव कोल्हे, सदानंद बागुल यांच्यासह शेकडो ठेवीदार आक्रोश मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती संजीव सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :MONEYपैसा