दडपशाहीचा मार्ग अवलंबून पोलीस प्रशासनाने बोगदा बंद
By Admin | Updated: July 27, 2015 00:53 IST2015-07-27T00:52:27+5:302015-07-27T00:53:03+5:30
इंदिरानगरवासीयांनी आंदोलन सुरूच ठेवले

दडपशाहीचा मार्ग अवलंबून पोलीस प्रशासनाने बोगदा बंद
इंदिरानगर : दडपशाहीचा मार्ग अवलंबून पोलीस प्रशासनाने बोगदा बंद केल्याच्या निषेधार्थ इंदिरानगरवासीयांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. पोलिसांच्या विरुद्ध नागरिकांनी दहा हजार सह्यांची म्इंदिरानगर बोगदा; स्वाक्षरी मोहीमनागरिकांचे आंदोलन : पहिल्याच दिवशी ३०० सह्योहीम राबविण्याचा संकल्प केला असून रविवारी (दि.२६) पहिल्याच दिवशी सुमारे तीनशे नागरिकांनी पोलिसांच्या विरुद्ध सही करून आवाज उठविला.
इंदिरानगर ते गोविंदनगरला जोडणारा बोगदा हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दहा दिवसांपासून बंद करण्यात आलेला आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई दडपशाहीची असल्याचा आरोप करीत जनआंदोलन सुरू झाले आहे. विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांनी संघटितरीत्या आंदोलन केल्यानंतरही प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून दहा हजार स्वाक्षरी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता १२ जुलैच्या मध्यरात्रीपासून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगदा बंद करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना वळसा घालून जाणे अधिकच शिक्षेचे वाटत आहे. या पर्यायी मार्गाला नागरिकांचा विरोध आहे. यासाठी मनसे, सेना, भाजपा या पक्षांनी आंदोलन छेडले असून पोलिसांनादेखील येथील परिस्थितीची माहिती दिलेली आहे. याबाबतचे काही पर्यायदेखील सुचविण्यात आले असून एकेरी वाहतूक, सिग्नलचा विचार करण्याचीही सूचना नागरिकांनी केलेली आहे; मात्र अद्यापही प्रश्न सुटलेला नाही.
पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी शंका उपस्थित केली असून या सर्वेक्षणाविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आता पोलिसांनी याप्रकरणी हरकती मागविल्या आहेत. त्यानुसार इंदिरानगरवासीयांनी गजानन महाराज मंदिरासमोर स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी सुमारे तीनशे नागरिकांनी सह्या करून बोगदा पुनश्च सुरू करण्याची मागणी नोंदविली आहे. अशा प्रकारच्या दहा हजार स्वाक्षरी घेण्याचा संकल्प रहिवाशांनी केलेला आहे.