शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेतील प्रकरणे पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:16 IST

ज्येष्ठ नागरिक तसेच निराधार व्यक्ंितना आधार देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचे कामकाज अतिशय संथगतीने सुरू असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे निकाली काढण्याची रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

नाशिक : ज्येष्ठ नागरिक तसेच निराधार व्यक्ंितना आधार देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचे कामकाज अतिशय संथगतीने सुरू असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे निकाली काढण्याची रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.ज्येष्ठ नागरिक व निराधारांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. मात्र जिल्हापातळीवर लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक दिव्यांतून जावे लागते. प्रशासकीय गतिमानता आली असल्याचे सांगितले जात असताना योजनांच्या कागदपत्रांचा प्रवास मात्र संथगतीने सुरू असल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे.संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेची निराधारांची प्रकरणे मागील एक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे. ही प्रकरणे मार्गी लागत नसल्याने लाभार्थ्यांची परवड होत आहे. याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (ए) वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेंतर्गत विधवा, घटास्फोटीत, दिव्यांग, वृद्ध, निराधारांना उदरनिर्वाहासाठी दरमहा ठाराविक पेन्शन दिली जाते, मात्र त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप रिपाइंकडून करण्यात आला.ज्येष्ठ नागरिक व निराधारांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाने मदतीसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेंतर्गत विधवा, घटास्फोटीत, दिव्यांग, वृद्ध, निराधारांना उदरनिर्वाहासाठी दरमहा ठाराविक पेन्शन दिली जाते. पेन्शन मिळावी, यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रकरणे प्रलंबित आहे. गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभच दिला जात नाही. त्यामुळे ही प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढत गरजूंना पेन्शन सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक