नांदूरवैद्य ते ञ्यंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान

By Namdeo Kumbhar | Updated: January 19, 2020 14:03 IST2020-01-19T14:00:58+5:302020-01-19T14:03:06+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या नांदूरवैद्य येथील पायी दिंडीचे ञ्यंबकेश्वरकडे ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरि च्या जयघोष तसेच टाळमृदंगाच्या गजरात आज त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथांच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या वारक-यांच्या पायी दिंडीचे आज सकाळी प्रस्थान झाले.

   Departure from Nandurvadi to Jambakeshwar | नांदूरवैद्य ते ञ्यंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान

श्री क्षेत्र ॠंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा उत्सव सोमवारी होणार असुन इगतपुरी येथील जोगमहाराज भजनी मठाची   दिंडी 

ठळक मुद्देपरिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. थंडीच्या कडाक्यातही विठ्ठल नामाचा गजर करीत लहान, थोर महिला वयोवृद्ध दिंड्या मध्ये सामील झाले आहे.आज दहा ते पंधरा दिंड्यांचा मुक्काम नांदूरवैद्य येथे झाला.


सालाबादप्रमाणे यावर्षीही संत निवृत्तीनाथ महाराज यांचा रथ सुवाच्छ हाराफुलांनी सजवण्यात आला होता.या रथामध्ये पांडुरंग तसेच संत ज्ञानेश्वर महाराज व संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या ठेवलेल्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यानंतर पायी दिंडीचे गावातुन फेरी काढत टाळमृदंगाच्या गजरात ञ्यंबकेश्वरकडे प्रस्थान करण्यात आले.यावर्षी देखील नांदूरवैद्य परिसरात अनेक दिंड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर हरिपाठ, भजन, कीर्तनाने रात्रभर जागर करीत भाविकांची जणू मांदियाळी जमली होती.पहाटे काकड आरती नंतर त्र्यंबकेश्वर कडे पालख्यांचे प्रस्थान झाले.या पायी हिंदीमध्ये नामदेव डोळस, अतुल तांबे, सखाहारी काजळे, सोपान मुसळे, संतोष डोळस, माजी सैनिक तुकाराम काजळे, प्रभाकर मुसळे आदींसह असंख्य ग्रामस्थ वारकरी सहभागी झाले होते.-- 

 

 

Web Title:    Departure from Nandurvadi to Jambakeshwar