देवळाली कॅम्पला बंद घर फोडले; ९७ हजारांचे दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 16:33 IST2021-05-31T16:32:59+5:302021-05-31T16:33:15+5:30

याप्रकरणी किशार आनंदा ससाणे (रा. गुरूद्वारारोड, सरकारी क्वार्टर) यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ससाणे कुटुंबिय हे त्यांच्या नातेवाईकांकडे धुळे येथे गेले होते.

Deolali broke the house off the camp; 97,000 worth of jewelery was looted | देवळाली कॅम्पला बंद घर फोडले; ९७ हजारांचे दागिने लुटले

देवळाली कॅम्पला बंद घर फोडले; ९७ हजारांचे दागिने लुटले

ठळक मुद्दे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा

नाशिक : कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी देवळाली कॅम्प परिसरातील शासकीय वसाहतीमध्ये राहणारे किशोर ससाणे यांच्या बंद घराचे कुलुप तोडून सुमारे एक लाख रुपयांचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी किशार आनंदा ससाणे (रा. गुरूद्वारारोड, सरकारी क्वार्टर) यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ससाणे कुटुंबिय हे त्यांच्या नातेवाईकांकडे धुळे येथे गेले होते. रविवारी ते पुन्हा राहत्या घरी परतले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडलेले आढळून आले. यामुळे ससाणे यांना संशय आल्याने त्यांनी त्वरित दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला असता लोखंडी कपाट फोडलेले दिसले. कपाटात ठेवलेले ४१ हजार ८०० रुपये किंमतीचे १ तोळे ७००ग्रॅम वजनाचे सोन्याचे नवीन नेकलेस, ३९ हजार ५५० रुपये किंमतीचे १ तोळा ७३० मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे नवीन मंगळसुत्र ३ ग्रॅम वजनाची सोन्याची १५ हजार २५० रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असा एकुण ९६ हजार ७०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Deolali broke the house off the camp; 97,000 worth of jewelery was looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.