दाट धुक्यामुळे कसारा घाटात ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 19:21 IST2019-07-17T19:21:14+5:302019-07-17T19:21:52+5:30
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात नवीन व जुन्या घाटात रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असुन, त्यातच रोडच्या दोन्ही लेनच्यामध्ये सफेद पट्या आखलेल्या नाहीत. त्यामुळे या घाटातील दोन्हीही रोडवर अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे.

दाट धुक्यामुळे कसारा घाटात ट्रक उलटला
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात नवीन व जुन्या घाटात रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असुन, त्यातच रोडच्या दोन्ही लेनच्यामध्ये सफेद पट्या आखलेल्या नाहीत. त्यामुळे या घाटातील दोन्हीही रोडवर अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे.
महिन्याभरापुर्वीच बिबळवाडी शिवारात एक भंगाराने भरलेला ट्रक पलटी होऊन त्यात ट्रक चालक जागीच गतप्राण झाला होता. आता पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती बुधवारी पहाटे घडली आहे.
मुंबई येथून नाशिकच्या दिशेने जुन्या कसारा घाटातून मध्य प्रदेश मधील लोखंडी पत्रे भरलेला ट्रक (एमपी.०९ एच एच१६२१) घाटातील फॉग सिटी जवळून चालला होता. ट्रक चालकाला दाट धुके असल्याने तसेच रोडच्या मधोमध सफेद पट्याच नसल्याने रोडचा अंदाज न आल्यामुळे तो थेट नाशिक दिशेच्या विरु ध्द मुंबई दिशेने जाणाऱ्या नविन घाटातील मुंबईच्या दिशेने जाणाºया रोडवर पलटी झाला. यामुळे या लेनवरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू असल्याने वाहतूकीवर परिणाम झालेला दिसला. परंतु सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नसून ट्रक चालक मात्र जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या ठिकाणी एकाच जागेवर दोनदा ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याने येथे अपघात स्थळ होवू नये याची काळजी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. दरम्यान या अपघाताचा तपास कसारा पोलिस व घोटी (टॅप) चे ट्रॅफिक पोलीस करीत आहेत.
( फोटो )
कसारा घाटात पलटी झालेला ट्रक.
(फोटो १७ कसारा, १७ कसारा१)